भुसावळात लोको पायलटच्या एटीएममधून परस्पर 90 हजार लांबवले ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील रेल्वे वसाहतीतील रहिवासी तथा लोको पायलट एल.टी. चौधरी यांच्या एटीएममधून अज्ञाताने परस्पर 90 हजार रुपये काढून घेतल्याची घटना 25 व 26 जानेवारीला घडली. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लोको पायलट चौधरी यांच्या मोबाईल सोमवारी रात्री 11 वाजता बँकेचा मेसेज आला की आपल्या खात्यातून 10 हजार रुपये काढले. याबाबत चौधरी यांनी तत्काळ एसबीआयच्या कस्टमर केअर सेंटरला फोन लावून झाला प्रकार सांगून एटीएम बंद करण्यासाठी सूचित केले. चौधरी बुधवारी एसबीआय बँकेत जाऊन व्यवस्थापकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली असता, चौधरी यांच्या बँक खात्यातून 40 हजार असे प्रत्येक वेळी 10 हजार प्रमाणे आणि एक वेळेस 50 हजार रुपये असे एकूण 90 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *