भुसावळ तालुक्यात महिलाराज – सरपंच पदाचे 2020-2025 आरक्षण जाहीर 20 महिला,19 पुरुष ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायत मध्ये सन 2011 च्या जनगणनेनुसार अनु.जमाती,नामाप्र व सर्वसाधारण सरपंच आरक्षण बाबत तक्ता आज दिनांक 29.1.2021 रोजी जाहीर झाले असून सरपंच पदाचे आरक्षण जाहीर 20 महिला,19 पुरुष सरपंच पदावर विराजमान होणार आहे.
अनु.जाती सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती तळवेल, मोंढाला ,मन्यारखेडा,शिंदी, साकरी, ओझरखेडा,कठोरा बुद्रुक,जाडगाव यामधील चार गावांमध्ये तळवेल, मोंढाला ,मन्यारखेडा,जाडगाव महिला आरक्षण राहणार आहे.तसेच अनु.जमाती सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती कंडारी,साकेगाव,पिंपळगाव बुद्रुक,वेल्हाळे, वराडसिम,मांडवेदिगर यापैकी तीन गावांमध्ये कंडारी,साकेगाव, मांडवेदिगर महिला आरक्षण राहणार आहे.नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती पिंप्रीसेकम, सुसरी,वांजोळा, जोगलखेडा,कठोरा खुद्रुक,कन्हाळे बुद्रुक, कु-हे,काहूरखेडा,पिंपळगाव खुद्रुक,फुलगाव,फेकरी यामधील सहा गावांमध्ये काहूरखेडा,पिंप्रीसेकम, सुसरी,वांजोळा, कन्हाळे बुद्रुक,जोगलखेडा महिला आरक्षण राहणार आहे.सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती हतनूर, गोजोरे, सुनसगाव,टहाकळी,दर्यापूर,आचेंगाव,बोहर्डी बुद्रुक,खडके, अंजनसोंडे,बेलव्हाय,कन्हाळे खुद्रुक, किन्ही,खंडाळे,चोरवड यापैकी सात गावांमध्ये हतनूर, गोजोरे, सुनसगाव,टहाकळी, दर्यापूर,आचेंगाव,किन्ही महिला आरक्षण राहणार आहे.

महिलांसाठी आरक्षण आज
शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंचायत समितीमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *