गाडगेबाबा अभियांत्रिकीत उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील हिंदी सेवा मंडळाचे शिक्षण सभापती रमेश नागराणी यांची भुसावळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराच्या प्रसंगी हिंदी सेवा मंडळ पदाधिकारी सत्यनारायण गोडयाले, संजयकुमार नाहटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी उपस्थित होते.
रमेश नागरणी यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळातही गरजूंना मदत केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उपनगराध्यक्ष पदी त्यांची निवड झाली आहे, अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे कार्य यापुढे असेच बहरत राहो, असे सांगून डॉ.आर.पी.सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *