भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील महाकालेश्वर मंडळातर्फे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते स्व गुरूवर्य धर्मविर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाकालेश्वर क्रिकेट चषक स्पर्धा 14 ते 27 जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या या स्पर्धेचा समारोप 27 रोजी संपन्न झाला .
दि.14 रोजी क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली होती तर .27 रोजी शिवसेना नेते स्व गुरूवर्य धर्मविर आनंद दिघे यांची जयंती होती त्यानिमित्ताने स्पर्धेची सांगता करण्यात आली .या स्पर्धेत साई सीसी यांनीं रोख रक्कम 21,000/- व ट्रॉफि पटकावत प्रथम विजयश्री मिळवली .
कार्यक्रमाचे प्रारंभी स्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांच्या प्रतिमेचे पुजन भरत पाटील यांच्या तर्फे करण्यात आले तर स्व आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेना शहर संघटक योगेश बागुल यांच्यातर्फे माल्यार्पण करून करण्यात आले .
महाकालेश्वर चषकाचे प्रथम मानकरी ठरलेल्या साई सीसी (Sai CC) यांना रोख रक्कम 21,000/- व ट्रॉफि शिवसेना शहर संघटक योगेश बागुल यांनी वितरण केले.
,द्वितीय पारितोषीक महाकालेश्वर क्रिकेट मंडळातर्फे उपविजेत्या संघास 11000/- व ट्रॉफि रवि भालेराव यांच्या तर्फे देण्यात
आले व तृतीय पारितोषीक एमएससीसी ( MS CC )भरत पाटील यांच्यातर्फे देण्यात आले.
यावेळेस रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललीत मुथा ,माजी नगर सेवक दिनेश जोगदंड ,माजी
नगर सेवक राहूल मकासरे ,प्रितम टाक, अभय आखाडे, किरण पाटील,प्रशांत बोदवडे, सागर काटकर,
नितीन ठाकरे, यशवंत चौधरी ,महेंद्र चौधरी, मिलींद सपकाळे, दिपक पोलके, रिंकी यादव, दिपक
बावीस्कर,विवेक शर्मा, बंडू ठाकरे, श्री यादव,विशाल खेडकर ,आंनद चौथमल , विजू मोरे ,गणु पांडे तन्वीर
तडवी ,बबलु नेतकर आदी उपस्थित होते.



