रावेर –

रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे या कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्या रजेवर गेल्याने रावेरचा पदभार भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे रावेरचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी पाहण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. यापूर्वी तायडे यांनी रावेरला निवासी नायब तहसीलदार म्हणून काम उत्कृष्ट काम केल्याने आजही ते रावेरकरांच्या स्मरणात आहे. अतिशय शांत व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे शिवाय कुणीही काम घेवून आल्यास ते काम पूर्ण होते, अशीही त्यांची ख्याती आहे.


