आगामी निवडणूक लक्षात घेवून अनिल चौधरी यांच्याविरुद्ध राजकीय षडयंत्रेतून फसवणुकीचा गुन्हा : ऍड राजेश शर्मा –


भुसावळ (प्रतिनिधी )-
आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेत माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा म्हणजे एक राजकीय षड्यंत्र असून चौधरी कुटुंब विरोधात रचलेले कटकारस्थान असल्याची माहिती त्यांचे वकील ॲड राजेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनिल चौधरी यांच्या विरोधात ममता सुधाकर सनासे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनिल चौधरी यांनी जामनेर रोड वरील नवशक्ती आर्केड मधील त्यांच्या मालकीचे पाच गाळे विक्रीचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा व्यवहार २०१९ मध्ये झाला होता मात्र अद्यापही खरेदीखत करून गळ्यांचा ताबा सनानसे याना दिलेला नाही. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अनिल चौधरी यांच्या वतीने त्यांचे वकील ऍड शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन, आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, अनिल चौधरी यांनी त्यांचे दुकान गाळे आयसीआयसी बँकेच्या ताब्यात दिले होते. तर सनासे यांच्याकडून घेतलेले पैसे हे उसनवारी साठी घेतले होते. मात्र त्यांनी कोऱ्या कागदावर अनिल चौधरी यांची स्वाक्षरी घेत बनावट खरेदी खत सादर केल्याचे ॲड शर्मा यांनी सांगितले. यावर चौधरी यांनी पोलिसात तानाजी पाटील, सुधाकर सनासे आणि ममता सनासे यांच्या विरोधात खोटे दस्तावेज म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे मात्र पोलिस प्रशासनाकडून अद्यापही यावर कारवाई होत नसल्याचे ॲड शर्मा म्हणाले. सनासे यांनी कोर्टात दावा दाखल केला असून याविरोधात चौधरी यांनी देखील प्रतिदावा दाखल केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. चौधरी याना राजकीय दृष्टीने बदनाम करण्यासाठी रचलेले कटकारस्थान असल्याचा खुलासा ऍड शर्मा यांनी यावेळी केला. याप्रसंगी पत्रकार परिषदेस ऍड योगेश दलाल, ऍड खालिद ए. शेख, धीरज चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *