भुसावळ ₹प्रतिनिधी )-

तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबाबत 28 व 29 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनु.जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण 28 रोजी सकाळी 11 वाजता तर महिला आरक्षण सोडत 29 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परीषद सदस्य आदींनी उपस्थिती रहावे, असे आवाहन तहसीलदार दीपक धीवरे यांनी केले आहे.


