भुसावळ (प्रतिनिधी )- हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील उंट मोहल्ला येथे
येथे साजरी करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक अड कैलास लोखंडे यांचे हस्ते प्रतिमा पूजनाचा करण्यात येवून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रम माजी जिल्हा प्रमुख एडव्होकेट जगदिशदादा कापडे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला. प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक दिगंबर सराफ, शरद पाटील, कोरोना योद्धा म्हणून महिला जिल्हा संघटिका सौ पुनम ब-हाटे, सौ प्रतिभा दुसाने यांचा तसेच ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आलेले साकेगाव येथील आनंद ठाकरे, कंडारीचे संतोष नाना निसाळकर ,श्री वासनिक यांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रसंगी एडव्होकेट शाम गोंदेकर, रेलकामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललित मुथा , साकेगाव नवनिर्वाचित ग्रा प सदस्य आनंद ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट शाम गोंदेकर , निलेश महाजन, कैलाश लोखंडे, ललित मुथा ,दत्तू नेमाडे , प्रदीप नेहते , जगू खेराडे ,एडव्होकेट
निर्मल दायमा, पत्रकार उज्वला बागुल , सुरज पाटील ,हेमंत ब-हाटे , पिंटू भोई चेतन भोई , गणेश काळे, धीरज वाढोंनकर, ललितकुमार मुथा , तसेच कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, जेष्ठ शिवसैनिक शिववाहतुक सेना संघटक उमाकांत शर्मा , मिलिंद जगदीश कापडे , नाना सराफ , अरुण धनगर, जिवन अहिरे , नितेश सराफ, विष्णु बऱ्हाटे , दिपक बाविस्कर, मयुर नेमाडे , राकेश पाटील, मयुर महाजन , गणेश सोनवणे, शाहरुख पिंजारी ,फिरोज पिंजारी, आवेश शेख, पपू शेख सर्व उंट मोहल्ला मित्र मंडळ उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रस्ताविक व आभार मुकेश गुंजाळ यांनी केले .



