भुसावळात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ; लाडू वाटप करून बाळासाहेबांना वाहिली आदरांजली ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
हिंदू हॄदय सम्राट सरसेनापती स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी भुसावळात शिवसेनेतर्फे जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त शिवसैनिकानी मिठाई (लाडू ) वाटून स्व बाळासाहेबांच्या प्रतिमेस जेष्ठ निष्ठावान शिवसैनिक शरद जोहरे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच
शहरातील जामनेर रोड भागात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करुन दैनिक सामनाच्या जयंती विशेषांकाचे मोफत वाटप करण्यात आले .
*बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार घराघरात शिवसैनिकांनी पोहचवावे- समाधान महाजन*
सामान्य माणूस हा बाळासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता त्याचे कल्याण हा त्यांचा ध्यास होता बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार घराघरात शिवसैनिकांनी पोचवावे असे प्रतिपादन तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी याप्रसंगी केले.

जेष्ठ शिवसैनिक जोहरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार दररोज न चुकता शिवसेना फलकावर स्वहस्ताक्षरात लेखन करून प्रचार व प्रसार केला त्या शरद जोहरे यांच्या हस्ते माल्यार्पण करून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातअभिनव अभिवादन केले
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विलास मुळे ,अँड श्याम श्रीगोंदेकर, प्रा उत्तम सुरवाडे , समाधान महाजन , संतोष सोनवणे , निलेश महाजन बबलू ब-हाटे ,जग्गू खेराडे, रवी सुतार , पप्पू बारसे, हिरामण पाटील , ललित मुथा , सुभाष पाटील , देवेंद्र पाटील , मनोज पवार, चंद्रकांत शर्मा , प्रवीण पाटील ,रमेश धरणे , पुनम ब-हाटे ,भुरा बाई चव्हाण , गजानन निळे ,नगरसेवक अँड.नरेंद्र लोखंडे, अँड कैलास लोखंडे, माजी नगरसेवक दीपक धांडे, अँड. निर्मल दायमा , प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर हेमंत खंबायत ,यांच्यासह शिवसैनिक व बाळासाहेब प्रेमी शहर व ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले.
या प्रसंगी सामना विशेष अंकाचे मोफत वितरण देवेंद्र पाटील व मनोज पवार यांनी केले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याचे आदेश सरकारने सरकारने केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
यावेळी शरद जयस्वाल ,नमा शर्मा ,सोपान भोई ,साई चरण चौधरी ,प्रवीण पाटील ,हेमंत पाटील ,प्रशांत पाटील , प्रतिभा दुसाने ,वैशाली विसपुते, कल्पना बुंदेले ,कविता कोळी कुऱ्हे पानाचे भारती गोसावी, रंजना गोसावी, हिराबाई पाटील ,गुणवंत पाटील, प्रदीप भुसारे ,प्रीतम कुमार टाक , योगेश माळी ,अरविंद थोरात , विनोद भाऊ वाघ ,गणेश भाई , पंकज पाटील ,पिंटू भोई ,लखन सोनवणे ,विकी चव्हाण,: उपशहर संघटक सोनी ठाकूर ,रमाकांत चौधरी, विजय चौधरी, कडू मामा चौधरीं , शिव कुमार दुबे ,नामदेव ब-हाटे, कविता सपकाळे ,यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
*शिव भोजनतर्फे अन्नदान व मिठाई वाटप*
आमचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदुहॄदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिव भोजन केंद्रसंचालक केंद्र संचालक शिवसैनिक उमाकांत नमा शर्मा यांच्या शिवभोजन केंद्रावर साहेबांचे प्रतिमापूजन व महा अन्नदान करण्यात आला तसेच सर्वांना ड्रायफूट लाडू देऊन गोडवा म्हणून देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *