भुसावळ पालिकेत विषय समिती सभापती निवड बिनविरोध


भुसावळ (प्रतिनिधि )-
भुसावळ न.प. च्या विषय समिती सभापती निवडीसाठी आज २० रोजी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंग द्वारे विशेष सभा तहसीलदार दिपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात विविध विषय समित्यांची सभापती निवड जाहीर करण्यात आली.
पालिकेतर्पेâ घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेला २९ पालिका सदस्यांनी सहभाग नोंदविला. विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्याधिकाNयांकडे सकाळी १० ते १२ या वेळेत निवडणुक लढविणाNया उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत दिली होती. यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती साठी हाजी मुन्ना तेली यांनी अर्ज दाखल केला. तर शिक्षण समितीसाठी मुकेश गुंजाळ, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य साठी प्रा. दिनेश राठी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीसाठी किरण कोलते, महिला व बालकल्याण साठी अरुणा सुरवाडे यांचे एकमेव अर्ज मुख्याधिकाNयांकडे प्राप्त झाले होते. पिठासन अधिकारी दिपक धिवरे यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करुन सर्व अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. तसेच सभापती निवडणुकीसाठी उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
तसेच यावेळी स्थायी समिती पदाधिकाNयांची निवड करण्यात आली असून अध्यक्ष पदी नगराध्यक्ष रमण भोळे हे पदसिध्द सभापती झाले. सदस्यांमध्ये हाजी मुन्ना तेली, मुकेश गुंजाळ, प्रा. दिनेश राठी, किरण कोलते, अरुणा सुरवाडे, अ‍ॅड. बोधराज चौधरी, प्रतिभा पाटील, उल्हास पगारे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *