भुसावळ (प्रतिनिधी)-
रेल्वे गाड्यांना प्रवाशांची वाढलेली गर्दी व प्रतिसाद पाहता गैरसोय टाळण्यासाठी नव्याने तसेच मुदतवाढ मिळून 30 गाड्या पूर्ववत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये केवळ आरक्षीत तिकीट असलेल्या प्रवाशाला कोरोना नियमांचे पालन करून प्रवेश मिळणार आहे.
एलटीटी-मंडुआडीह सुपरफास्ट एक्स्प्रेस
डाऊन 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंडुआडीह सुपरफास्ट उत्सव विशेष गाडी 1 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे. प 02168 अप मंडुआडीह-लोकमान्य तिलक टर्मिनस सुपरफास्ट उत्सव विशेष गाडी 2 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे.

उत्सव विशेष गाड्यांना मार्चपर्यंत मुदतवाढ
डाऊन 01115 पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस दर गुरुवारी 4 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 01116 गोरखपूर-पुणे (दर शनिवारी) 06 फेब्रुवारी ते 27 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02135 पुणे- मंडुआडीह एक्स्प्रेस (दर सोमवार) 1 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02136 मंडुआडीह-पुणे (दर बुधवारी) 3 ते 31 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 01407 पुणे-लखनऊ (दर मंगळवार) 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 01408 लखनऊ-पुणे (दर गुरुवारी) 4 फेब्रुवारी ते 1 एप्रिलपर्यंत धावणार आहे. डाऊन 01033 पुणे-दरभंगा (दर बुधवारी) 3 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 01034 दरभंगा-पुणे (दर शुक्रवारी) 5 फेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंत धावणार आहे. डाऊन 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर (दर गुरुवारी) 4 एप्रिल ते 25 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 01080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (दर शनिवारी) 6 फेब्रुवारी ते 27 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02031 पुणे-गोरखपूर (दर मंगळवारी व शनिवारी) 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02032 गोरखपूर-पुणे (दर गुरुवारी व सोमवारी) 4 फेब्रुवारी ते 1 एप्रिलदरम्यान धावणार आहे. डाऊन 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा (दर शुक्रवारी व मंगळवारी) 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस (दर रविवारी व गुरुवारी) 4 फेब्रुवारी ते 1 एप्रिलदरम्यान धावणार आहे. अप 04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (दर शुक्रवारी) 5 ते 26 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. डाउन 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर (दर शनिवारी) 6 ते 27 फेब्रुवारीदरम्यान धावणार आहे. अप 01235 नागपूर-मडगाव (दर शुक्रवारी) 5 फेब्रुवारी ते 26 मार्चदरम्यान धावणार आहे. डाऊन 01236 मडगांव-नागपूर (दर शनिवारी) 6 फेब्रुवारी ते 27 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर (दर गुरुवारी व सोमवारी) 4 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (दर शुक्रवारी व मंगळवारी) 5 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02879 एलटीटी-भुवनेश्वर (दर बुधवारी व शनिवारी) 3 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02880 भुवनेश्वर-एलटीटी (दर सोमवारी व गुरुवारी) 1 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02858 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम (दर मंगळवारी) 9 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02857 विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार) 7 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 08501 विशाखापट्टणम-गांधीधाम (दर गुरुवारी) 4 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 08502 गांधीधाम-विशाखापट्टणम (दर रविवारी) 7 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02827 पूरी-सुरत (दर रविवारी) 7 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02828 सूरत-पुरी (दर मंगळवारी) 9 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. अप 02866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस (दर मंगळवारी) 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत धावणार आहे. डाऊन 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी (दर गुरुवारी) 4 फेब्रुवारी ते 1 एप्रिलपर्यंत धावणार आहे.


