भुसावळ (प्रतिनिधी )-

बाजारपेठ पोलीस स्टेशन भाग 5 गुरन 24/2021 भा द वि कलम-394,452,427 ,504,34 प्रमाणे दिनांक 19.01.2021 रोजी 02.26 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील फिर्यादी सारंगधर महादेव पाटील, रा.गुंजाळ कॉलनी भुसावळ याचे हायवे रोड वरील ढाब्यावर दिनांक 18.01.2021 रोजी 22.23 वाजता 1)बाबा काल्या 2)समीर 3)नईम सोबत 3 इसम अशानी फिर्यादीच्या ढाब्यावर अनधिकृत प्रवेश करून गल्ल्यातील 7000/- चोरून नेले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यागुह्यातील आरोपी 1)शेख रिजवान उर्फ बबलू शेख अशपाक वय-20 रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ 2)परवेज हमीद कुरेशी वय-24, रा.आगाखान वाडा भुसावळ 3)सय्यद वसीम सय्यद वय-33,रा.पंचशील नगर भुसावळ 4)शेख नईम शेख सलीम वय-33 रा.दीनदयाळ नगर भुसावळ 5)समीरउद्दीन अमिनोउद्दीन वय-25,रा.शनी पेठ जळगाव अशाची बातमी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळाल्या वरून पहाटे भुसावळ शहरातून खडका चोफुली वरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील मुख्य आरोपी 6)आसिफ उर्फ बाबा काल्या असलम बेग वय-25 रा.अयान कॉलनी भुसावळ याची बातमी मिळल्यावरून त्यास सायंकाळी भुसावळ शहरतील मुस्लिम कॉलनी भागातून ताब्यात घेणे करिता गेले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून स्वतःला कात्री मारून घेतली असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे त्यावरून त्याच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो स्टे ला भाग 5 गुरण 25/2021 भा द वि कलम-353,309, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे ,तसेच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली स पो निरी कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे,मंगेश गोटला पो हे का नेव्हील बाटली,पो ना किशोर महाजन,
रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर,उमाकांत पाटील, पो का विकास सातदिवे, ईस्वर भालेराव, दिनेश कापनडे,होमगार्ड धुळीचंद तायडे, अझ्झाजउद्दीन अमिनोउद्दीन अशानी केली आहे.


