बस मध्ये राहिलेली बॅग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रवाश्यास मिळवून दिली –


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ बस स्थानकावर एका बस मध्ये जागा सांभाळण्या करीता खिडकीमधुन सीट वर बॅग ठेवलेल्या प्रवाश्याची बॅग येथील बाजारपेठ पोलिसांनी त्वरीत सीसीटीव्हीच्या फुटेज वरुन तपासचक्रे फिरवून प्रवाश्यास मिळवून दिल्याने पोलिसांच्या या टिमचे विशेष कामगिरिचे कौतुक होत आहे .
दि 8 जानेवारी रोजी भुसावळ बस स्टँड येथे मूकबधिर प्रवासी अजित साळुंके रा. वाकड जिल्हा पुणे हे दुपारी 3 वाजेचे सुमारास औरंगाबाद बसने जाण्याकरीता बस जवळ आले दरम्यान बस मध्ये जागा सांभाळण्यासाठी त्यांच जवळील बॅग बसच्या खिडकी द्वारे आत सीटवर टाकली व शौचालयास निघून गेले. ते परत येत नाही तोवर त्यांची बॅग असलेली बस ही बस स्थानकातुन निघून गेली.
प्रसंगी ड्युटीवर असलेले होमगार्ड विनोद पाटील, विशाल मेघे यांना प्रवाश्याने इशाऱ्या द्वारे सविस्तर घटना सांगितली बॅग मध्ये त्यांचे अतिशय महत्वाचे कागद पत्र असल्याचे सांगितले . यावेळी ड्युटीवर असलेले होमगार्ड विनोद पाटील यांनी लागलीच त्या प्रवाश्यास गाडीवर बसवून नहाटा कॉलेज पर्यंत गेले असता सदर बस ही तेथूनहीँ निघुन गेल्याचे दीसले त्यांनी परत त्या प्रवाश्यास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे मदत कामी आणले यावेळी बस नंबर माहीत नसल्याने .या बाबत माहिती पोलीस नाईक उमाकांत पाटील यांना कळविली असता पाटील यांनी सीसीटीव्ही फूटेज च्या आधारावर बस नंबर मिळवून ती बस जामनेर बस डेपो येथील असल्या बाबत सांगितले यावरून जामनेर बस डेपो येथे कळविले असता अजित साळुंके यांची बस मध्ये राहिलेली बॅग मिळून आली सदर बॅग ही जामनेर भुसावळ बस द्वारे रविवार रोजी 4 वाजता परत भुसावळ बस स्टँड येथे मागवून अजित साळुंके यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यांनी सपोनि मंगेश गोटला, पो ना उमाकांत पाटील ,होमगार्ड विनोद पाटील ,विशाल मेघे ,अफसर सय्यद ,सचिन कोळी व इतर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले व पुढील प्रवासा साठी पुणे लॅक्सरी स्टॉप येथे होमगार्ड विनोद पाटील,विशाल मेघे यांनी सुखरूप पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *