भुसावळ (प्रतिनिधी )-

: शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकातील स्विट पान मसाला नावाच्या टपरीतून बाजारपेठ पोलिसांनी राज्यात प्रतिबंधीत असलेला 10 हजार 373 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता. 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी पानटपरी चालक दिलीप तुळशीराम जावळे (55, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती. आरोपीच्या चौकशीत त्याने हा गुटखा आनंद वाटपाडे (27, हनुमान नगर, भुसावळ) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास 10 रोजी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीची खोलवर चौकशी करून गुटख्याचा साठा जप्त करू, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.


