भुसावळ :(प्रतिनीधी )-
शहरात वीज कंपनीतर्फे नुकतीच भूमिगत केबल टाकण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्येदेखील भूमिगत केबल टाकण्यासाठी डांबरी रस्ता खोदण्यात आला मात्र केबल टाकण्यात आल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी माती तशीच लोटण्यात आल्याने नागरीकांना साधे पायीदेखील चालणे कठीण झाले आहे. वास्तविक वीज कंपनीने रस्ता खोदल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे असताना तसे न करता रस्ता खोदण्यात आल्यानंतर निघालेली मातीच टाकण्यात आल्याने नागरीकांना पायी चालणेदेखील दुरापास्त झाले आहे. या संदर्भात अभ्यासू नगरसेवक तथा सी.ए.दिनेश राठी यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना लेखी तक्रार केली असून जुन्या तलाठी कार्यालयाजवळ डीपीचे काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीची जवाबदारी नेमकी कुणाची? याबाबत माहिती कळवण्याचे कळवले आहे शिवाय संबंधित वीज कंपनीची जवाबदारी असल्यास तातडीने रस्ता बनवण्याच्या सूचना द्याव्यात, असेही तक्रारीत नमूद केले आहे.



