भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खेडी बुद्रूक शिवारातील पुरूषोतम विजयसिंग महाजन यांच्या शेतातून चोरट्यांनी 38 हजार रुपये किंमतीचे शेती साहित्य चोरट्यांनी लांबवले. ही घटना 1 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बुधवारी रात्री तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवार, 1 रोजी महाजन हे सायंकाळी सात वाजेपर्यंत शेती कामांसाठी थांबून होते मात्र ती घरी परतताच चोरट्यांनी संधी साधली. रात्री दहा वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर ते पंप सुरू करण्यासाठी शेतात आले असता शेतात एक दुचाकी उभी आढळले तरे कुणीतरी बॅटरी चमकावत असल्याचे दिसताच महाजन यांनी आवाज दिल्यानंतर संशयीत पसार झाला. अज्ञात चोरट्याने 28 हजार रुपये किंमतीच्या 19 नग कपलिंग, 10 हजार रुपये किंमतीचे नग पाईप लांबवले. महाजन यांनी बुधवारी रात्री तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे पुढील तपास करीत आहे.



