भुसावळ (प्रतिनिधी )-
भाजप वैद्यकीय आघाडीच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शहरातील ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी आणि कोरोनाचे संशयीत किंवा संक्रमित रुग्ण परंतु ज्यांना कुठलाही त्रास नाही, ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात क्वॉरंटाईन सेंटर सुरू ठेवण्याचे आदेश जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण दिले आहेत.
भाजप वैद्यकीय आघाडीच्या यशस्वी पाठपुरावा
भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कोरोनाचे संशयीत किंवा संक्रमित रुग्ण परंतु ज्यांना कुठलाही त्रास नाही, ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी तरी ग्रामीण रुग्णालयात क्वारँटाईन सेंटर, भुसावळ येथे सुरू ठेवण्याची मागणी केली होती शिवाय आमदार संजय सावकारे यांच्या कानावरही हा प्रकार टाकण्यात आला होता. आमदारांनी जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी आणि कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात कॉरंटाईन सेंटर सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, आगामी काळात कंत्राटी आरोग्य सेवकांच्या पूर्ननियुक्तीसाठी प्रयत्न होणार आहेत, असेही डॉ.नी.तू.पाटील म्हणाले.



