कल्याण येथील ‘पत्री पूल’ रेल्वे पुलासाठी दोन दिवस पॉवर ब्लॉक ;
रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्याचे काम सुरु ;
भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचालीत करणार आहे. चार ब्लॉक पैकी दोन ब्लॉकचा तपशील खालीलप्रमाणे आहे (उर्वरित दोन ब्लॉकचे तपशील जे २८ व २९ नोव्हेंबर, २०२० रोजी निर्धारित आहे ते नंतर जारी करण्यात येईल)

ब्लॉक १ : शनिवार दि. २१.११.२०२० रोजी सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५ पर्यंत
• उपनगरी गाड्या रद्द
o डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
o ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
o ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
• गाड्यांचे डायव्हर्शन
o 02168 मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01059 लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत.
o कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
• गाड्यांचे नियमन
o 02812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), 02617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि 04151 कानपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये १५ ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
• गाड्यांचे वेळापत्रक पुन:निर्धारण
o 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी विशेष २१.११.२०२० रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल आणि 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी विशेष दि. २२.११.२०२० रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल.
ब्लॉक २: रविवार दि. २२.११.२०२० रोजी सकाळी ९.५० ते दुपारी १.५० पर्यंत
• उपनगरी गाड्या रद्द
डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ९.२० ते दुपारी १.५० दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
o ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला , ठाणे , डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
• गाड्यांचे डायव्हर्शन
o 03201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 02187 जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, 02168 मंडुआडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा – वसई रोड – जळगाव मार्गे वळविण्यात येतील.
o कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
• गाड्यांचे नियमन
08225 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) २० मिनिट ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
• गाड्यांचे वेळापत्रक पुनःनिर्धारण
o 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी १.४० वाजता सुटेल, 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -जबलपूर विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी २.५५ वाजता सुटेल आणि 02586 लोकमान्य टिळक टर्मिनस – बरौनी विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल.या इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.


