दरोड्याच्या प्रयत्नातील वॉण्टेड आरोपीचा साप चावल्याने मृत्यू ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील आरपीडी रस्त्यावर गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा रविवार, 8 रोजी रात्री झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खातरजमा केली होती मात्र त्याचवेळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या तर तीन संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले होते. या गुन्ह्यात हव्या असलेल्या संशयीत आरोपी भारत दिलीप वाकेकर (22, रा.समता नगर, भुसावळ) याचे मंगळवारी सकाळी 10 वाजता सर्पदंशाने उपचारादरम्यान गोदावरी रुग्णालयात निधन झाले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारत दिलीप वाकेकर (22, रा.समता नगर भुसावळ) यास 14 रोजी घराच्या ओट्यावर विषारी सर्पाने दंश केल्याने त्यास गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. दरम्यान, रविवार, 8 नोव्हेंबर रोजी रात्री दरोड्याच्या प्रयत्नात पवन असलेल्या रामु सोनवणे (24), राकेश अशोक बाविस्कर (19, दोन्ही रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती तर संशयीत भारत वाकेकर (भुसावळ) व त्याचे अन्य दोन साथीदार पसार झाल्याने त्यांचा कसून शोध सुरू होता. वाकेकर याच्याविरुद्ध खुनाचाही गुन्हा दाखल असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *