मुक्ताईनगर :- चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आज मुक्ताईनगर येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
यामध्ये नारायण हरी अहिरराव माजी सरपंच,हिलाल देवराम अहिरराव माजी सरपंच,युवराज कौतीक अहिरराव माजी वि का सो चेअरमन, दत्तू मधुकर पाटील,संजय हिम्मत अहिरराव, विकास मधुकर आमले, हिरकणाबाई पाटील,गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील,रंजना पाटील,अनिता पाटील,आशाबाई पाटील,संगीता पाटील, किशोर आमले,भोजराज आमले,शिंपी सर,कुणाल पाटील, सतिष पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले पाटबंधारे मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात आणि परिसरात अनेक लहान मोठी धरणे मंजुर केली त्यामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला , कृषी मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र मंजूर केले आहे ते पूर्णत्वास न्यायचे आहे त्यासाठी मी परत पाठपुरावा करणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आगामी काळात सर्वांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घ्यायची आहे आणि येत्या सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवायची आहे
यावेळी राष्ट्रवादी ओ बी सी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, रुपेश भोसले,निरज आमले,शिवराज पाटील,योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते


