भुसावळ (प्रतिनिधी ) –
रिक्षाचालकांनी रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे , अन्यथा कारवाईस सामोरे जावे असा इशारा वजा सूचना भुसावळ येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिल्या.
भुसावळ शहरातील रस्त्याची आधीच दयनीय अवस्था झालेली आहे त्यात दिवाळी सणा निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा बाजारपेठ बहुतांशी फुलली आहे . अश्यावेळी शहरातील विविध भागातील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बेशिस्तपणे रस्त्यावरती व बाजारपेठेत उभ्या केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे .या अनुषंगाने यामुळे आज गुरुवार दिनांक ५ रोजी येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालक मालक यांची बैठक भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यांमध्ये घेण्यात आली.
यावेळी रिक्षाचालक मालकांना संबोधित करताना वाघचौरे म्हणाले की आरटीओच्या नियमांचे रिक्षाचालकांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ज्या ठिकाणी रिक्षा स्टॉप आहे. त्याच ठिकाणी रिक्षा थांबवीण्यात याव्यात, रस्त्यावरती रिक्षा लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दखल रिक्षाचालकाने घेतली पाहिजे नियमांचे पालन न करणारे व कायदा मोडणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाघचौरे यांनी यावेळी दिला .
बैठकीस पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , बाळासाहेब ठोम्बे, यांचेसह सपोनि मोरे आदी उपस्थित होते .



