केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वात निघणार महामोर्चा ; भुसावळ शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या आदेशाने तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर शिवसेनेची बैठक संपन्न झाली.
केंद्र शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात हजारोंच्या संख्येत बाईक रँली काढण्याच्या नियोजनार्थ हि बैठक होती. नीलकंठ फालक, प्रा.धिरज पाटील, बबलू बऱ्हाटे, दीपक धांडे, श्याम श्री गोंदेकर, कैलास लोखंडे, निर्मल दायमा, देवेंद्र पाटील, अबरार ठाकरे, पवन नाले, नरेंद्र लोखंडे, सोनी ठाकूर, गोकुळ बाविस्कर, मनोज पवार, मेहमूद शेख, पिंटू भोई, सुरज पाटील, मोहसीन तडवी, प्रदीप भुसार, आमिर पठाण, नबी पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या महामोर्चात सहभागी होण्यासाठी गल्ली गल्लीतुन शिवसैनिकांना आवाहन करा, नवचैतन्य निर्माण करण्याची ही एक संधी मिळाली आहे असे बैठकीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष नीळकंठ फालक यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ६५ टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहे. त्यातून सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. त्यामूळे केंद्र शासनाने लागू केलेला नविन कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांना मोडकळीस आणणारा आहे. त्यामूळे कृषी विधेयकास विरोध म्हणून १६ ते १७ विषय हातात घेवून रावेर लोकसभेतील प्रत्येक तालूक्यातून हजारोंच्या संख्येत बाईक रँली आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असून त्याकरिता शिवसेनेचे मंत्री तसेच ज्येष्ठ शिवसेना नेते या मोर्चाप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भुसावळ मतदार संघातील तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे म्हणून औद्योगिक वसाहत (MIDC) कडे, दिपनगर, व अन्य ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे असे माजी नगरसेवक कैलास लोखंडे म्हणाले.
शहरातील रस्ते, शेतरस्ते, पिण्याच्या पाण्यासंदर्भात समस्या तसेच इतर कामे वरिष्ठांना कळवा त्यातून मार्ग निघेल असे आवाहन उपजिल्हा प्रमुख श्याम श्रीगोंदेकर यांनी केले.
सूत्र संचालन देवेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बबलू बऱ्हाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *