वरणगाव प्रतिनिधी ,
वरणगाव बसस्थानक चौकात खडसे साहेबांचा सत्कार कार्यक्रम सुरू असतांना कार्यकर्त्याच्या गर्दिचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे पाकिटे व खिशातील रोख रूपये लांबविल्याची घटना दि २५ रविवार रोजी सकाळी ११ वाजता घडली होती . सशयीत आरोपीविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होतो . दि २८ रोजी भुसावळ तालुक्यातील न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश यांनी एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनाविली .

वरणगाव शहरातील पत्रकार बातमी घेण्यासाठी गर्दीत गेले असता पत्रकार सुरेश महाले यांच्या खीशामधुन १३ हजार ४३० रूपये चोरांनी काढून घेतल्याने त्यांच्या फिर्यादि वरून वरणगाव पोलिसांत संशयीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असतांना वरणगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांनी लागलीच तपसचक्रे फिरवल्याने संशयीताला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले . सदरील संशयीत हा अट्टल गुन्हेगार असुन त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात घरफोडि,चोरी, रेल्वे पोलिसांत जबरी लुटमारींचे गुन्हे दाखल असुन तो मुंबई येथून नाथाभाऊंच्या ताफयाबरोबर मुक्ताईनगर पर्यंत होता नाथाभाऊचा जिथे जिथे सत्कार करण्यात आला त्या त्या ठिकाणी त्यानी पाकिटमारी रोख रकमांची चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगीतले असुन तो संशयीत एकटा नसुन त्याच्या सोबत आणखी ७ते ८ संशयीत असण्याची शक्यता असल्याचे देखील पोलिसांचा अंदाज असुन सुरेश महाले ( पत्रकार ) १३३४०रू, अशोक भोई ३०,०००रु, एहसान निसार शेख १५००रु, चंद्रकात चौधरी ८०००रु, समाधान चौधरी ८००० रुपये ,पप्पु जकातदार ५३००रू, समद अली कासम अली २६००रु यांची अशी एकुण ६५६२०रु रोख रक्कम चोरीस गेली असुन संशयीत शेआलिम शे.अजगर रा. गौसीयानगर भुसावळ याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कस्टडी मिळाली आहे .


