खिर्डी ता.रावेर-

महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियानअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामा करीता विविध प्रकारचे एकुण ६०० दाखले वाटप करण्यात आले, तसेच शिब रस्ते व पाणंद रस्ते ची पाहणी करुन व अतिक्रमण रस्ताचे कारण कामी शेतक – यांशी चर्चा केली , तसेच मतदारसंघातील संजय गांधी विधवा कुटुब अर्थसहाय्य योजने अंतर्गत २९ लाभार्थ्यांना प्रत्यकी २० हजार प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले.तसेच फेर फार आदालत फेर फार नोंदी घेवून ७/१२ उतारे वाटप करण्यात आले .कोविड महामारी काम करणारे आरोगय सेवक आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला .
सदर कार्यक्रमास रावेर तहसिलदार सौ.उषाराणी देवगुणे ,नायब तहसिलदार संगायो,मनोज खारे,अ कागजेंद्र शेलकर ,मंडळ अधिकारी सचिन पाटील,तलाठी प्रविण वानखडे, तलाठी अनंता साल , ईसेवा केंद्र चालक स्वप्नील पवार तसेच गावातील शेतकरी डि.के.महाजन, किशोर पाटील , उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी ग्रामपंचायत सदस्य,उदय पाटील,रेंभोटा येथील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील, मुबारक उर्फ राजू तडवी,माजी सरपंच अनिल चौधरी आरोग्य केंद्राचे डॉ राणे,यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पाटील सर आभार प्रदर्शन अनंत येवले यांनी केले.


