भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील सहा दुर्गोत्सव मंडळांनी चार फुटापेक्षा मोठ्या उंचीची मूर्ती बसवू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्यानंतरही नियमांचे उल्लंघण केल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, गोपनीय विभागाचे नंदकिशोर सोनवणे, संदीप परदेशी यांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीवरून शहरातील हिंदी कॉलनीमधील कृष्णा नवदुर्गा मंडळ, न्यू सिंधी नवदुर्गा मंडळ, मा वैष्णवी नवदुर्गा मंडळ, बंब कॉलनी मधील ओम साईराम नवदुर्गा मंडळ, हिंदी न्यू देवी भक्त नवदुर्गा मंडळ आणि फ्रेंड्स ग्रुप नवदुर्गा मंडळाविरुद्ध भादंवि भादंवि 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.



