हद्दपार आरोपी शम्मी चावरीया भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –


भुसावळ (प्रतिनिधी )-
गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर हद्दपार करण्यात आलेला आरोपी शहरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवार रोजी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले .
शम्मी प्रल्हाद चावरीया ३२, रा.वाल्मिक नगर, भुसावळ या आरोपीस अटक केली आहे.
आरोपी चावरीया हा भुसावळ शहरात पांडुरंग टॉकीजजवळ असल्याची माहिती मिळाल्या
नंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, सहा फौज इरफान काझी, किशोर मोरे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *