भुसावळ (प्रतिनिधी )-अमरावती शहर मधील नागपुरी गेट पो.स्टे.ला २०१८ साली भाग 5 गु.र.न १८४ / २०१८ भा.द.वी क.३६३,३६६,३७६ पो.स्को ४ व ६ दाखल असुन यातील फरार आरोपी विशाल जितेंद्र जावळे वय २३ रा.जामनेर रोड वाल्मीक नगर भुसावळ हा असुन त्याचा शोध घेण्याबाबत दि.२१ /१०/२०२० रोजी अमरावती शहर मधील नागपुरी गेट पो.स्टे.चे सफौ.सुरेश डबरे यांनी कळविले . त्यानुसार
पो.नि. दिलीप भागवत यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाल्याने यांच्या आदेशाने
दि.२१ रोजी भुसावळ शहरातुन टिंबर मार्केट परीसरातुन आरोपीस ताब्यात घेवुन भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनला आणुन आरोपीस पो.नि. दिलीप भागवत यांच्या आदेशाने अमरावती शहर मधील नागपुरी गेट पो.स्टे चे सफौ.सुरेश डबरे पो.ना.अकिल खान यांना पुढील कारवाई साठी यांच्या ताब्यात दिले .
सदर कारवाई जिल्हा पोलीसअधिक्षक प्रविण मुंढे
, अप्पर पोलीस.अधिक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलिस.अधिकारी सोमनाथ वाघचौरे
पो.नि दिलीप भागवत
यांच्या मार्गदर्शनाखाली
बाजार पेठ पोलीस स्टेशनचे स.पो.नि अनिल मोरे स.पो.नि मंगेश गोटला सर पो.ना रविंद्र बि-हाडे,कृष्णा देशमुख ,रमन सुरळकर,उमाकांत पाटील पो.कॉ विकास सातदिवे ,प्रशांत चव्हाण ,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे ,सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे अश्यांनी केली.



