भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ विभागात नव्याने रूजू झालेले उपविभागीय
पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभार
स्विकारल्यानंतर २१ बुधवार रोजी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.यावेळी वाघचौरे बोलत होते .
भुसावळ शहर व तालुक्यातील अवैध धंदे ,वाढती गुन्हेगारी, वारंवार सापडणारे गावठी कट्टे, गोळीबाराच्या घटना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार याबाबत त्यांनी सखोल अभ्यास केलेला असून, गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी व रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त
लावण्यासाठी विशेष कृती अभियान राबवाले जाणार आहे.
भुसावळ शहरातील सर्वात मोठी अडचण रस्त्यावरील
वाहतुकीची आहे. रस्त्याच्या आजुबाजूला अतिक्रमण धारकांना हातगाड्या उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण करीत
असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ते
रस्त्यावरील सर्व अतिक्रमण
संध्याकाळी काढण्यास
सुरुवात केली जाणार आहे. बाकी अतिक्रमण नगरपरिषदेच्या
मुख्याधिकारींची भेट घेऊन त्यांनी काढण्याच्या सुचना देण्यात
येणार आहे . रस्त्यांवर जमाव करून तसेच रात्रीच्या वेळेस
कट्ट्यावर बसलेल्यांवर पायी पेट्रोलिंग करून कारवाई केली
जाणार आहे. तर रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे. नवदुर्गा २१० मंडळांना अधिकृत परवानगी देण्यात आली
आहे.यामध्ये आरतीला पाच जणांच्या वर कुठलेही कार्यकर्ते नको तसेच गरबा,दांडिया,डीजे विसर्जन करतांना कुठलेही वाद्य
वाजविले जाणार नाही.या सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.तसेच या मंडळाची पुढील परवानगी रद्द करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांचे
आदेशावरून जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेले
आहे.तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या
आदेशाने गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आलेली असून
रेकॉर्ड वरील गुन्हेगार,हिस्ट्रीसीटर यांच्यावर बारकाईने लक्ष
ठेवण्यात येणार आहे.तसेच अवैध गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर
तसेच संघटित गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रसंगी मोक्का कारवाई करण्यासाठी कोर्टातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात
आलेली आहे.तसेच बाल गुन्हेगारांच्या कुटूंबियाची भेट घेऊन बाल गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व गोपनीय विभागाचे पो.ना.नंदकिशोर सोनवणे , सचिन पोळ आदीं उपस्थित
होते.



