सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन –


भुसावळ –
सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन नुकतेच डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी सिनी डीपीओ एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी संपादक संतोषकुमार उपाध्याय, कला शिक्षक आर.पी.जावळे आदी उपस्थित होते. विद्यालयाने गेल्या 31 वर्षांपासून वार्षिक नियतकालिक प्रकाशीत करण्याची परंपरा कायम राखली असून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी दरवर्षी नियतकालिक प्रकाशित केले जाते. यात विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा असे विविध साहित्य प्रकाराने सजलेले सृजन निश्चितच विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यालयातील विविध उपक्रमांची छायाचित्रे, यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्राचार्य कुलकर्णी यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *