भुसावळ (प्रतिनिधी )-
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पाटील यांनी सपत्नीक श्री शारदा देवीची स्थापना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच विद्यार्थिनीं शिवाय केवळ शिक्षकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे काटेकोर पालन करून उत्सव होत आहे. विद्यार्थिनींच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याच्या हेतूने रांगोळी, निबंध, वेशभूषा, नेल आर्ट हस्ताक्षर स्पर्धा आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राची देसाई यांनी विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने सर्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



