डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलची तोडफोड- गुन्हा दाखल –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी पंचशील नगर भागात एका तरुणास जुन्या भाडंणावरून लोंखडी रॉड ने मारहाण केल्याचा घटना घडली असून त्या जखमीस डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असतांना त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याचा राग नातेवाईकांना आल्याने त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , फिर्यादी डॉ.राजेश तुकाराम मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री पंचशील नगरातील रहिवाशी शेख कैफ शेख जाकीर यास उपचारासाठी डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले असतांना उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ.उमेश मधुकर सपकाळे यांनी घोषित केले यांचा राग 10 ते 12 नातेवाईकांना आल्याने शिवीगाळ करून हॉस्पिटलचे काउंटरला लाथा मारून काच फोडला.तसेच खुर्चीचे नुकसान केले.म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19/10/2020 रोजी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा अधिनियम (4) गु.र.न. 896/2020 भा.द.वि कलम 427,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये 10 ते 12 आरोपींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *