बंद घर टार्गेट ; घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर भागात अज्ञात चोरट्यांने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७हजार रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी नगरमध्ये मुन्ना तेली यांच्या घराजवळअजीज ठेकेदार यांचे मालकीचे घरात फिर्यादी इकरामुल हक मोनिस खान हे भाड़ेकरु म्हणून राहतात . लॉकडाऊन दरम्यान घरी नसतांना चोरी झाल्याचे आज उघडकिस आले . यावरुन फिर्यादि इकरामुल हक मोनिस खान यांनी फिर्याद दिली की ,
दिनांक १६ मार्च २०२० च्या रात्री १० वाजेच्या सुमारापासून ते १९ ऑक्टोबर सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील एल.ई.डी टीव्ही,चांदीच्या वाट्या,चांदीचे तोरडया,सोन्याच्या अंगठ्या,नाकातील फुली,कानातील सोन्याच्या रिंग असा एकूण ३७ हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना तेजस पारीसकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *