वरणगाव (प्रतिनिधी )-

राज्यात दरवर्षी रस्ते अपघात होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते बरेच अपघात वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने होतात विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती केल्यास निश्चितपणे भावी पिढीत जनजागृती होऊ शकते या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच वाहतूक नियमांची माहिती देण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावर प्रशिक्षण देऊन जिल्हा व तालुका स्तरावर माहिती देण्यात येणार आहे
आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण पालक असून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या बाबत जनजागृती केल्यास दरवर्षी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते या दृष्टिकोनातूनच प्राथमिक शिक्षण संचालनालय व प्रादेशिक परिवहन विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी व 4 उपक्रमशील शिक्षक यांचा गट तयार करून त्यांना व्हीसी द्वारे राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाईल राज्यस्तरावर झालेले प्रशिक्षित गट जिल्हा स्तर व तालुका स्तरावर इतर शिक्षकांना प्रशिक्षण देईल यानंतर शाळेतील प्रशिक्षक शिक्षक ऑनलाइन शिक्षणा वेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील नियमांचे माहितीबरोबर वाहतुकीबाबत माहिती देईल अशाप्रकारे वेगळी माहिती न सांगता दैनंदिन अध्यापन वेळी विद्यार्थ्यांना उदाहरण, व्हिडिओ यामधून किंवा पीपीटी द्वारे जनजागृती करण्यात येईल याबाबतचे पत्र शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी काढले आहे
20 ऑक्टोबरला होणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपशिक्षणाधिकारी विजय पवार राजेंद्र सपकाळे सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे यामध्ये हे सुनील वानखेडे (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव) संदीप पाटील (बी आर गणू महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालय अभोडे बुद्रुक तालुका रावेर) योगेश सोनवणे (बी यु एन रायसोनी मराठी स्कूल एमआयडीसी जळगाव) निलेश पाटील (जय दुर्गा माध्यमिक विद्यालय मेहरुण जळगाव) यांची निवड करण्यात आली असून प्रशिक्षण घेणार आहेत


