भुसावळात उद्या आमदारांसह नगराध्यक्षांच्या निवासस्थानासमोर निदर्शने – वंचित बहुजन आघाडीचा इशारा


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील नागरी समस्या सुटाव्यात, पंचशील नगरातील घरकुलांचा प्रश्‍न सुटावा यासह अन्य न्याय मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळचे विद्यमान आमदार व भुसावळ व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवास्थाना समोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत.
भुसावळ शहरातील नागरी समस्या सुटाव्यात. पंचशील नगरातील रखडलेल्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, शौचालय व पुल बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. नागरीकांनी पंचशील नगर, विहाराजवळ सोमवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, जिल्हा सदस्य अरुण तायडे, गणेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *