भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील खडका रोड भागातील सुमारे ३०४ वर्षापूर्वीचे महालक्ष्मी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. सन २००१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वी इथे छोटे मंदिर होते मात्र त्याीं पडझड झाली असल्याने काही भाविकांनी एकत्र येऊन जीर्णोद्धार केला. घटस्थापने निमित्त रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. विशेष म्हणजे, माता महालक्ष्मी या विविध परीवारांची ही कुलदेवता असून मुंज व कान टोचणे आदी विविध नियमित विधी होतात. मंदिराच्या जीर्णोद्धारासोबतच वृक्षारोपण करण्यात आले आहे. भाविकांना अध्यात्माची गोडी लागली म्हणून अनेक ग्रंथ ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्व.अनिल गंगाधर पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहे. देवीपुढे मनोभावे प्रार्थना केल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे ट्रस्टींमध्ये मनोहर लक्ष्मण बर्हाटे, अनिकेत सुधीर पाटील आदींचा समावेश आहे. महालक्ष्मी ग्रुपचे लीलाधर भारंबे, मधूकर लोखंडे, चंद्रकांत पाटील, निवृत्ती महाराज, किशोर अरुण पाटीज, अभिषेक पाटील तसेच पाटील व बर्हाटे परीवारातील सदस्य उत्सव यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.



