भुसावळ (प्रतिनिधी )-
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे शेतात चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पीडीत कुटुंबाच्या भेटीसाठी आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी भेट घेत भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर अत्याचार करणार्या मंगल भील या आरोपीवर कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदनावर विजय (बाळा) पवार, दिनेश इखारे, रूपेश साळुंके, विद्यासागर खरात, शुभम सोयंके यांच्या स्वाक्षर्या आहेत.



