दलित पँथरतर्फे निवेदनाद्वारे वांजोळे घटनेचा निषेध

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील वांजोळे येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर झालेल्या अत्याचार तसेच रावेर तालुक्यातील बोरखेडे येथे आदिवासी कुटुंबातील चौघा भावंडांच्या हत्येचा दलित पँथरने निषेध करीत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जळगावात केली. या घटनांची सीबीआय चौकशी करून या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी दलित पँथरने निवेदनाद्वारे केली. निवेदनावर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजू महाले, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *