भुसावळ | प्रतिनिधी

येथील सात वर्षीय बालिकेवर ३५ वर्षिय नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेनंतर संबंधित परिवारावर दबाव आणाला जात असल्यामुळे भिम आर्मीच्या पदाधिकारी या पिडीत परिवाराला सुरक्षा देण्यासाठी दाखल झाले.तसेच लोकप्रतिनीधी व स्थानिक प्रशासनाने पिडीत कुटुंबाची साधी भेटही न घेतल्यामुळे कार्यकत्यार्ंंनी निषेध व्यक्त केला. यामुळे तालुका पोलिसही घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दि.१६ रोजी सकाळी ११ वाजेेपासून गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील पिडित बालिकेच्या कुटुंबावर काही लोकांकडून दबाव आणला जात आहे. त्यामुळे कुटुंबात घबराहट निर्माण झाली आहे. यानंतर कुटुंबाने संरक्षण मिळण्याची मागणी भिम आर्मीकडे केली होती. त्यामुळे दि. १६ रोजी पदाधिकार्यांनी येथिल भिलवाडी भागात जमा होऊन कुटुंबाच्या सुरक्षेला सुरुवात केली. मात्र पिडित कुटुंबाच्या घराजवळ कार्यकर्त्यांची गर्दी पाहता तालुका पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत घटना स्थळी दाखल होऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. यावेळी तालुका पो.स्टे.चे पो.नि. रामकृष्ण कुंभार, शहरचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, एपीआय अमोल पवार, हे.कॉं. विजय पोहेकर, विठ्ठल फुसे यांच्यासह सहकारी व होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी भिम आर्मीच्यावतीने, पिडित कुटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत देऊन न्याय मिळवा. संंबंधित नराधमावर कडक कावरवाई करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच घटनेच्या तीन दिवसांनंतरही पिडित बालिका व कुटुंबाची भेट स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी घेतलेली नाही. संबंधितांनी कुटुंबाची भेट घेऊन मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी केली आहे. यावेळी भिम आर्मीचे राज्य प्रवक्त रमाकांत तायडे, महासचिव श्रीकांत वानखेडे, विक्रम प्रधान, तालुकाध्यक्ष विजय मालवीय, डॅनी वानखेडे, सुपडू संधानशिव, किशोर जोगदंड, शहाध्यक्ष विक्रमसिंग राजपूत, उपाध्यक्ष आकाश भालेराव, भावेश भालेराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांची घेणार भेट- दरम्यान, कुटुंबाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष पाहता भिम आर्मीचे पदाधिकारी दि. १७ रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सपकाळे यांनी सांगितले.


