सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘ सृजन ‘ चे डीआर एम विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते प्रकाशन


भुसावळ (प्रतिनिधी )-
सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘ सृजन ‘ चे प्रकाशन शुक्रवार रोजी डी आर एम विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. ह्या प्रसंगी एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ, सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल, संतोषकुमार उपाध्याय संपादक,आर पी जावळे कला शिक्षक आदी उपस्थित होते,विद्यालयाने गेल्या ३१ वर्षापासून वार्षिक नियतकालिक प्रकाशित करण्याची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी दर वर्षी प्रकाशित केले जाते यात विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, शब्दकोडे. प्रश्नमंजुषा असे विविध साहित्य प्रकारा ने सजलेले सृजन निश्चितच विद्यालया साठी अभिमानाची बाब आहे तसेच विद्यालयातील विविध उपक्रमांची छायाचित्रे, यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दायी ठरतात.
फोटो ओळ – भुसावळ येथिल रेल्वे स्कुलच्या नियतकालीक पुस्तिकेचे प्रकाशन करतांना विवेक कुमार गुप्ता सोबत डावीकडून एन डी गांगुर्डे,सतीश कुलकर्णी, संतोषकुमार उपाध्याय आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *