नवदुर्गा मंडळांची मिटिंग संपन्न ; सुचनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नवदुर्गा मंडळांची परवानगी धारक २० ते २५ मंडळाना बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत गुरुवारी
मिटिंग संपन्न झाली.यामध्ये मंडळाच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या व सुचनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
दिनांक १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना होणार आहे.या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नवदुर्गा मंडळांची मिटिंग बोलवून सूचना देण्यात आल्या.यामध्ये नवदुर्गा मंडळ १० बाय १० चे स्टेज हवे.मूर्ती ४ फुटाच्या वर नको.आगमन व विसर्जन करते वेळी मिरवणूक नको.नवदुर्गेची आरती करतांना स्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे.आरती प्रसंगी केवळ ५ जण असावे त्यापेक्षा जास्त गर्दी नको.सोशल डिस्टनसींगसह मास्क ,सेनिटाइजर, नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.नवदुर्गा उत्सवामध्ये गरबा,दांडिया तसेच कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाही. तसेच कोरोना,डेंग्यु, मलेरिया सारखे इतर साथीचे आजारांचे प्रतिबंधात्मक उपाया बाबत जनजागृती करावी. डीजे,बॅण्ड पार्टी, ढोल ताशे कुठलेही वाद्य वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे असून
यासर्व सूचनांचे कुठल्याही मंडळांनी उल्लंघन केल्यास त्या मंडळावरती कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वजा सूचना बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिल्या.
बैठकीस सपोनि अनिल मोरे,सपोनि मनीष गोटला,पोना.किशोर महाजन,गोपनीय विभागाचे नंदू सोनवणे, संदीप परदेशी,सचिन पोळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *