सतनाची तरुणी लोहमार्ग पोलिसांनी केली पालकांच्या स्वाधीन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सतना येथील तरुणीने संतापात घर सोडल्यानंतर त्याबाबत पालकांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवल्यानंतर ०९०९० मुजफ्फरपूर-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून या तरुणीला ताब्यात घेण्यात आले व नंतर पालकांच्या स्वाधीन तिला करण्यात आले. सतना येथील पालकांनी लोहमार्गच्या महिला पोलिस हवालदार अलका ढवळे यांना तरुणीबाबत माहिती व गाडी क्रमांकासह तरुणीचे वर्णन कळवले व त्यानंतर महिला पोलिस कॉन्स्टेबल आशु शेट्टीयार यांचे मदतीने हवालदार पांडुरंग वसु, सहाय्यक फौजदार किशोर वाघ यांनी १४ रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर तरुणीला ताब्यात घेतले. तरुणीचे पालक लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या उपस्थितीत मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *