वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगाव येथे पाण्याची परिस्थिती बिकट वारंवार आंदोलने करूनही तीच परिस्थिती असल्याने शिवसेनेचा मोठ्या आंदोलनाचा इशारा वरणगाव येथील बऱ्याच प्रभागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रभाग क्रमांक पाच मधील अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे समस्या मांडल्या त्याचा जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी वरणगाव नगर परिषद यांच्याकडे गेल्या असता नागरिकांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या
निवेदनात म्हटले आहे की येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल सदर प्रसंगी महिलांच्या प्रतिक्रिया देखील संतप्त होत्या प्रभाग क्रमांक पाचमधील अनेक महिला पुरुषांसह अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक शेख सईद शेख भिकारी माजी उपसरपंच यांच्या प्रतिक्रिया देखील होत्या सदर प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गोसावी यांना पाणी पुरवठा करण्याबाबत विनंती केली व त्यांच्याकडून दोन दिवसात पुरवठा सुरळीत करतो असे लेखी आश्वासन घेतले.
सदर बाबतीत त्यांनी त्याच वेळी पाणीपुरवठा अभियंता श्री गणेश चाटे व पाणीपुरवठा मुकादम श्री गणेश तळेले यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना त्वरित सर्वेक्षण करायला सांगून त्वरित कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करावा असे सांगितले प्रसंगी जिल्हा संघटक विलास मुळे उपतालुका प्रमुख प्रकाश कोळी नीलेश ठाकूर ,अतुल पाटील ,सम्राट मराठे, निलेश पाटील ,निलेश सुरळकर, कैलास पाटील ,यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक महिला व पुरुष उपस्थित होते.



