वरणगाव शहरातून होणारी राखेची वाहतूक तात्काळ बंद करावी –


वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगाव शहरातून होणारी राखेची वाहतूक तात्काळ बंद करावी अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करणार असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे . याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे .
बर्‍याच महिन्यांपासून वेल्हाळा तलावातून येणारे राखेने भरलेले डंपर वरणगाव मार्गे २४ तास राखेची वाहतूक राष्ट्रीय महामार्ग मध्ये भरती करण्यासाठी करीत असतात सदर डंपर मधून उडणारे राख व रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता वरणगाव मार्गे होणारी राखेची वाहतूक त्वरित थांबवावी त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना देखील भरपूर त्रास सहन करावा लागत आहे .
राखेचे वाहतूक करणारे डंपर अतिशय वेगाने डंपर चालवत असून त्यामुळे छोटे-मोठे अनेक अपघात झालेले आहेत ज्या रस्त्याने वाहतूक केली जाते त्या रस्त्याने रेल्वे स्टेशन ,विविध हॉस्पिटल ,माध्यमिक शाळा, बस स्टँड ,असा परिसर आहे. डंपर मधून वाहून नेत असलेली राख रस्त्यावर सांडली जाते त्यानंतर ती हवेत उडते त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला विक्री करणारे किराणा दुकानदार मेडिकल स्टोअर धारक व इतर दुकानदार यांना त्याचा भरपूर त्रास होतो व सामान्य जनतेस ग्राहकांना देखील भरपूर त्रास होतो .
याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देऊन सदरची वाहतूक तात्काळ थांबवण्याची विनंती केली आहे ही वाहतूक तात्काळ न थांबल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन ,उपजिल्हा संघटक विलास मुळे ,जिल्हा संघटक अल्पसंख्यांक अफसर खान ,यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *