भुसावळ (प्रतिनिधी )-
यावल तालुक्यातील निमगाव येथील विजया कावडकर (40) या विवाहित महिलेने तापी नदीच्या पूलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. पूलावरून येणार्या जाणार्यांनी आरडा ओरड केली मात्र तोपर्यत महिला नदीपात्रात रक्ताच्या थारोळ्यात पडली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना माहिती मिळताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार संजय पाटील, भूषण चौधरी, जाकीर शेख यांना नदीवर रवाना केले. महिलेने आत्महत्या केली ती हद्द फैजपूर पोलिस ठाण्याची असल्याने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली, फैजपूर पोलिस आल्यावर महिलेस तापी नदीपात्रातून वर काढण्यात आले. महिलेचे विच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.



