भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या बदलीनंतर पद रीक्त होते. 14 रोजी गृह विभगाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी बदल्यांचे आदेश काढले. वाघचौरे हे यापूर्वी शिर्डी विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी कार्यरत होते तर गत आठवड्यात त्यांची बदली झाली असलीतरी त्यांना बदलीचे ठिकाण मिळालेले नव्हते.
भुसावळातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान
नूतन पोलिस उपअधीक्षकांपुढे भुसावळातील गुन्हेगारी थोपवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. क्षुल्लक-क्षुल्लक बाबींवर शहरात होणारे खून, वाढत्या चोर्या-घरफोड्यांच्या घटना नियंत्रणात आणण्याचे आव्हान अधिकार्यांपुढे असणार आहे. दोन दिवसात पदभार स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.



