जळगाव-
जळगाव विभागाच्या महिला उपविभागीय अधिकारी (प्रांत) दिपमाला चौरे व लिपीक अतुल सानप या दोघांना आज शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील फिर्यादीचा वाळू व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना असून सदर वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडले होते.
त्या दोन्ही गाड्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात उभ्या करण्यात आल्या होत्या.या दोन्ही गाड्या सोडण्यासाठी प्रांत दिपमाला चौरे यांच्या वतीने त्यांचा लिपीक अतुल अरुण सानप याने फिर्यादीस दोन लाख रुपयांची मागणी केली होती.मात्र तडजोडी अंती सव्वा लाख रुपये ठरले होते. या लाचेची रक्कम लिपीक अतुल सानप यांच्या खासगी पंटरने स्विकारली.सदर कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.



