भुसावळात एकावर चाकू हल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील इराणी मोहल्यात एकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवार दुपारी ही घटना घडली असली तरी जखमीने उशीरा दिलेल्या जवाबानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर येथील ख्वाजा नगरमधील रहिवासी मूकदत अली सलीम अली जाफरी हे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मशिदीतून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवर बसत असतानाच मोहम्मद लियाकत अली इराणी आणि उंबर बनी उर्फ दुंडी लियाकत अली इराणी (रा.भुसावळ) यांनी त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याचा आरोप आहे. मुकदत अली यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी गुरुवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद लियाकत अली इराणी व बनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *