सेतू सुविधा केंद्रातून दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी करणार तक्रार


वरणगाव (प्रतिनिधी )-
इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागले असून पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लागणारे विविध दाखले भुसावळ येथील सेतू सुविधा केंद्रातून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची ची शक्यता आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र चौधरी सोमवारी भेटून तक्रार करणार असून दाखले लवकर द्यावे अशा प्रकारचे मागणी करण्यात आली आहे
इयत्ता व दहावी बारावीचा निकाल लागलेला आहे तसेच इयत्ता अकरावी व पुढील इंजीनियरिंग मेडिकल डी फार्मसी बी फार्मसी आयटीआय यासह विविध शाखांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लागणारे डोमेसाईल जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले यासाठी भुसावळ येथील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत जवळपास पंधरा ते वीस दिवस उलटून देखील या ठिकाणाहून दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे संबंधित विभागाने यावर दखल घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्वरित विद्यार्थ्यांना दाखले देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांनी केली आहे

तक्रार करणार
शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध दाखले मिळवण्यासाठी सेतू सुविधा केंद्राकडे अर्ज केले परंतु अद्यापही हे दाखले मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने यावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे
राजेंद्र चौधरी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *