प्रतिनिधी वरणगाव) –

राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2020 चा निकाल आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्तीत घोषित करण्यात आला या स्वच्छ सर्वेक्षणात 50 हजार लोकसंख्येच्या आतील शहरात वरणगाव शहराचा भारताच्या पश्चिम विभागात 23 वा क्रमांक व नाशिक विभागात 5 क्रमांक मिळाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली
नवनिर्मित पालिका असतानादेखील स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला होता 28 नोव्हेंबर 2017 रोजी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून 2018 मध्ये 48 क्रमांक 2019 मध्ये 79 क्रमांक तर 2020 मध्ये आलेख उंचावत वरणगाव नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण यात 4198.57 हे गुण मिळाले आहे यामुळे देशात 23वा तर नाशिक विभागात 5 वा क्रमांक मिळाला असून शहरास ओडिएफ प्लस प्लस चा दर्जा, जीएफसी 1 स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे पालिकेची कामगिरी प्रत्येक वर्षी उंचावत असल्याने शासनाकडून विकास कामासाठी अधिक बक्षिसाचा निधी मिळणार आहे वरणगाव नगरपरिषदेच्या या कामगिरीत शहरातील 50 हजार जनतेचा सहभाग मोलाचा ठरला म्हणून देशात 23 वा क्रमांक येऊ शकला यात माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक सर्व नगरसेवक मुख्यधिकारी शामकुमार गोसावी स्वच्छता अभियंता गणेश चाटे कार्यालयीन अधिक्षक प्रशांत सूर्यवंशी आरोग्य निरीक्षक दीपक भांगळे महेंद्र मोरे गोकुळ भोई गौतम इंगळे रिंकू इंगळे सुनील तायडे यांच्यासह सर्व पालिकेचे कर्मचारी यांनी परिश्रम आहे
मॉडेल शहर करण्याचा मानस
स्वच्छ सर्वेक्षणात वरणगाव नगरपालिकेने सहभाग नोंदवून स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व निकषांची ची पूर्तता करत व जनतेचे, सहकारी नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक पटकाविला शहराला मॉडेल शेअर करण्याचा मानस असून त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहेत
सुनील काळे माजी नगराध्यक्ष


