भुसावळातील व्यापाऱ्यांना कोविड तपासणी सक्तीची ;


भुसावळ(प्रतिनिधी )-
नगरपरिषद क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भुसावळचे उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी भुसावळ पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदारांना कोविड -१९ बद्दल तपासणी करून घेणे सक्तीचे असल्याचा आदेश दिनांक १९ ऑगस्ट २०२० रोजी काढला आहे.
ज्या व्यापाऱ्यांकडे आणि दुकानदारांकडे कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी असेल असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

भुसावळ तालुक्यातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कोरोना नमुना चाचणी करून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व तहसीलदार दिपक धिवरे यांनी केले आहे.मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोना चाचणी करावी जेणे करून आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकांच्या मनातील भीती ही दुकानांच्या समोर लावलेल्या कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र पाहून कमी होईल.यासाठी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे.जर कुठल्या व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य न केल्यास त्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली.व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ शहरातील मुनिसिपल हायस्कूल ,जामनेर रोड येथे तपासणीसाठी वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरील वैद्यकीय पथक कोविड निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्यांना जागेवरच कोविड -१९ निगेटिव्ह प्रमाणपत्र देणार आहे.
व्यापारी व सामान्य नागरिक यांनी या दिवशी कोरोना तपासणी करावयाची आहे. फळे व भाजीपाला विक्रेते,दूध विक्रेते, मेडिकल व्यवसायिक २० ऑगस्ट २०२० ते २२ ऑगस्ट,मटण,चिकन,विफ व मासे विक्रेते,वाईन शॉप,देशी दारू दिनांक २४ ते २५ ऑगेस्ट २०२० तसेच किराणा व्यवसाय, सलून,हॉकर्स व इतर व्यवसाय २६ ते२८ ऑगेस्ट २०२० रोजी ठरवून दिलेल्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान म्युनिसिपल हायस्कुल, जामनेर रोड येथे आयोजित तपासणी केंद्रात दुकानदारांनी तपासणी करून निगेटिव्ह प्रमाणपत्र घ्यावे ,ही तपासणी अनिवार्य असल्याचे सूत्रानी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *